राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे, दि. २ मे २०२५:
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ‘एक गाव, एक पोलीस’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात १ मे २०२५ पासून करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रभावी अंमल, नागरिकांशी थेट संवाद आणि गुन्हेगारी प्रतिबंध करणे हा आहे.
या उपक्रमाअंतर्गत पुणे ग्रामीण हद्दीतील एकूण १५७४ गावांमध्ये पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून, आतापर्यंत १२९२ पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांची १५२५ गावांमध्ये नियुक्ती पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांसाठी लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक गावामध्ये एक पोलीस अधिकारी/कर्मचारी हा गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नेत्यांशी नियमित संवाद साधून गावात शांतता, सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्थेची स्थिती राखण्यासाठी कार्यरत असेल.
या उपक्रमामुळे community policing संकल्पनेला चालना मिळून पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होईल, स्थानिक गुन्ह्यांवर वेळीच नियंत्रण ठेवता येईल, तसेच नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे.
संपर्कासाठी:
पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
शिवाजीनगर, पुणे – ४११००८
दूरध्वनी: (०२०) २५६५७८७८
ई-मेल: sp.pune.r@mah
apolice.gov.in