राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा समुह
थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) – चिंतामणी विद्या मंदिर तथा चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय, मु.पो. थेऊर, ता. हवेली, जि. पुणे या संस्थेचा इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यंदाही मुलींनी आपला शैक्षणिक दबदबा सिद्ध केला आहे. एकूण १८ विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण निकाल ४४ टक्के लागला आहे.
गुणानुक्रमे अव्वल ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
१. चव्हाण अंजली परसू – ६४.३३% (प्रथम क्रमांक)
२. माळी वैभवी खंडुजी – ५८.३८% (द्वितीय क्रमांक)
३. कांबळे प्रणाली बापु – ४८.३३% (तृतीय क्रमांक)
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर, वर्गशिक्षक पठाण सर तसेच संपूर्ण शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाकडून आगामी वर्षात निकालात वाढ करून अधिकाधिक विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात
आला आहे.