राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
चिंतामणी विद्या मंदिर, थेऊर येथे मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने यावर्षी ९४.४% निकालाची घवघवीत कामगिरी नोंदवली आहे.
या परीक्षेसाठी एकूण ८७विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ३ विद्यार्थी गैरहजर राहिले तर ८४विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केवळ ५ विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले.
या वर्षीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे:
१)पडळकर ज्ञानेश्वरी दादा – ८९.८०%
२)पडळकर मयुरी भीमा – ८९.६०%
३)अत्तार सलमा सय्यद – ८९.२०%
४)गोंधळेकर अनुष्का हरीश – ८७%
५)सहानी पियुषकुमार राजेंद्र – ८३%
विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये शिक्षक वर्गाचा मोलाचा वाटा असून वाडकर मॅडम आणि जठार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक काकडे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.