
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे (प्रतिनिधी) :
डॉ. आंण्णाभाऊ साठे क्रांती सेना महिला शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा पुणे जिल्ह्यातील वाघोली (केसनंद रोड, बीआरटी बसस्टॉप समोर) येथे संपन्न झाला. या शाखेचे उद्घाटन वाघोली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सौ. मीना (काकी) सातव यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे महिला जिल्हाध्यक्ष सविता ताई पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सौ. आरती ताई शिवशरण (अध्यक्ष), सौ. चिंतामणी पासवान (उपाध्यक्ष), व सौ. कमल ताई शिंदे (कार्याध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आंण्णाभाऊ साठे क्रांती सेना पश्चिम विभाग अध्यक्ष राजाभाऊ आडागळे, पश्चिम विभाग महिला अध्यक्ष सौ. उषाताई खिल्लारे, उपाध्यक्ष सौ. आशाताई डांबरे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. विलास झोंबाडे, युवा अध्यक्ष श्री. सागर भाऊ साठे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. मनोज भाऊ गायकवाड, पुणे शहर महिला अध्यक्ष सौ. आरतीताई शर्मा, उपाध्यक्ष सौ. ज्योती ताई कीर्तने, तसेच जिल्हा सदस्या सौ. वंदना ताई भाडे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सविता ताई पांचाळ म्हणाल्या, “डॉ. आंण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन (भाऊ) साठे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ही केवळ सुरुवात आहे, अजून खूप मोठं काम पुढे करायचं आहे.”
कार्यक्रमाचे संचालन आणि संयोजन अतिशय उत्साहात पार पडले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नवीन शाखेस पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.









