
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कोरेगावमूळ (पूर्व हवेली) प्रतिनिधी
कोरेगावमूळ ग्रामपंचायतीचे सरपंच भानुदास खंडेराव जेधे-देशमुख यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार 2025’ ने गौरवण्यात आले. दैनिक संध्याच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांना सामाजिक व ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. आमदार संजय चंदुकाका जगताप, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, दैनिक संध्याच्या वृत्तसंपादिका ज्योतीताई नाळे, पत्रकार स्नेहा कुलकर्णी आणि सतिष राठोड यांच्या हस्ते भानुदास जेधे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास महंत गोपालव्यास कपाटे, आप्पासाहेब कड, निशांत कड, सुरज बोधे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकृत करताना सरपंच भानुदास जेधे म्हणाले, “सरपंच म्हणून काम करत असताना केवळ कामालाच प्राधान्य दिले. शासनस्तरावरील सर्व उपक्रम उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवले. आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन दैनिक संध्याने जो पुरस्कार दिला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीला दिशा देणारे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून काम करणारे सरपंच म्हणून भानुदास जेधे यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.









