उरुळीकांचनमध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

 

उरुळी कांचन– अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी विनायक वकील चव्हाण (वय अंदाजे ३० वर्षे, रा. इंदिरानगर, उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार जुलै २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून मार्च २०२५ पर्यंत घडल्याचे समोर आले आहे.

जेफिर्यादी (नाव गोपनीय, वय १८ वर्षे) हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक चव्हाण हा तिच्या ओळखीचा असून, आरोपीच्या मालकीच्या कारखान्यात ती काम करत होती. या काळात आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन, तिची इच्छा नसतानाही वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. घटनेच्या वेळी फिर्यादी अल्पवयीन असल्याचे आरोपीला माहीत असूनही, त्याने हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. या अत्याचारामुळे फिर्यादी गर्भवती झाली आहे.

या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गु.र. क्रमांक २२६/२०२५ नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील समतुल्य BNS कलम 64(1), 64(2)(i), 64(2)(m), 351(2), 351(3) तसेच POCSO कायद्यांतर्गत कलम 4, 6, 8, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:२२ वाजता आरोपीला अटक केली. पुढील तपास मा. पोलीस उपनिरीक्षक मटाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags