
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर प्रतिनिधी वृत्तसेवा
गणेशोत्सव म्हटला की घराघरात बाप्पाच्या आगमनासोबत विविध आकर्षक सजावट पाहायला मिळतात. यंदा आदरणीय संतोष तुपे सरांनी केलेली क्रिकेट थीमवरील सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

भारताच्या प्रत्येकाच्या हृदयाशी जोडलेला क्रिकेट खेळ त्यांनी सजावटीचा मुख्य भाग म्हणून निवडला आहे. हातात बॅट घेऊन मैदानात उभे असलेले गणपती बाप्पा जणू खऱ्या क्रिकेटपटूप्रमाणे भाविकांच्या मनावर राज्य करत आहेत.

मूर्तीसमोर विविध क्रिकेट ट्रॉफ्यांची आकर्षक मांडणी केली असून त्यामुळे सजावटीत एक वेगळाच उजाळा आला आहे. प्रकाशयोजना आणि रंगसंगतीच्या सुंदर संगमामुळे बाप्पा जणू सर्व ट्रॉफ्या जिंकून आलेले ‘चॅम्पियन’ भासत आहेत.
ही सजावट फक्त डोळ्यांना आनंद देणारी नाही तर एक प्रेरणादायी संदेशही देते –“
परिश्रम, संघभावना आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी जिथे असतात तिथे यश नक्की मिळते.”
संतोष सरांची ही सजावट म्हणजे सर्जनशीलता, कला आणि भक्तीचा उत्कृष्ट मेळ. परिसरातील भाविकांनी या सजावटीचे मनापासून कौतुक केले असून, ती उत्सवातील एक खास आकर्षणठरली आहे.









