शिवसेना जिल्हा संघटक निलेश दादा काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर (पुणे) :
शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक निलेश दादा काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन माननीय राम रेपाळे साहेब राज्य सचिव महाराष्ट्र राज्य शिवसेना यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर महानगर प्रमुख माननीय रवींद्र धंगेकर,यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय राम रेपाळे साहेब म्हणाले, “निलेश माझा लाडका कार्यकर्ता आहे. तो माझ्याशी भांडतो, पण ते भांडण स्वतःसाठी नसून समाजासाठी असते. त्यामुळे मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या “७० टक्के समाजकारण आणि ३० टक्के राजकारण” या संकल्पनेवर उभी राहिलेली शिवसेना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामान्यांच्या प्रश्नांना खरी दिशा देत आहे.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाषणात सांगितले की, “संपर्क कार्यालय हे मंदिर आहे आणि येथे येणारे नागरिक हे दैवत आहेत. त्यांच्या समस्या मार्गी लावणे हीच खरी सेवा आहे.”
माननीय नाना भानगिरे यांनी ग्वाही दिली की, “निलेश भाऊंना भविष्यात मोठी संधी मिळेल. त्यांनी सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करून त्यांचे प्रश्न सोडवावेत. पक्ष त्यांच्या खंबीर पाठीशी उभा आहे.”
भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रवीण काळभोर यांनी निलेश दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, “सर्वसामान्य घरातून आलेले निलेश दादा आज जनतेचा आवाज बनले आहेत. त्यांच्या पाठीशी तरुणाई व महिला वर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे भविष्यात ते नक्कीच चांगले कार्य करतील.”
या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. त्यामध्ये –देविदास आण्णा काळभोर (माजी उपसरपंच कदम वाकवस्ती),प्रवीण काळभोर (जिल्हा नियोजन समिती सदस्य पुणे), आरोग्यदुत युवराजनाना काकडे,अलंकार कांचन (जिल्हा नियोजन समिती सदस्य पुणे),पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर (चेअरमन, दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे),मनोज काळभोर (तंटामुक्ती अध्यक्ष लोणी काळभोर),सतीश काळभोर (उपाध्यक्ष हवेली राष्ट्रवादी काँग्रेस),भारत मिसाळ (माजी पंचायत समिती सदस्य पुणे),विपुल शितोळे (तालुका प्रमुख शिवसेना हवेली),सागर फरतडे (शहर प्रमुख उरुळी कांचन शिवसेना),पारस वाल्हेकर (उपतालुका प्रमुख हवेली शिवसेना),सौ. राजश्री काळभोर (माजी उपसरपंच ग्रामपंचायत कदम वाकवस्ती),सौ. सुनंदा काळभोर (सदस्य ग्रामपंचायत कदम वाकवस्ती),नंदू पाटील काळभोर (माजी सरपंच कदम वाकवस्ती ग्रामपंचायत),दिलीप नाना वाल्हेकर (अध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित दादा गट),रमेश जी भोसले (उपतालुका प्रमुख हवेली शिवसेना उबाठा),गजानन काळभोर (सामाजिक कार्यकर्ते लोणी काळभोर)सागर राजगुरू अध्यक्ष छत्रपती सेवा संघ सचिव निखील काकडे आदी मान्यवरांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलंकार कांचन यांनी केले तर सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. मोठ्या संख्येने युवक, नागरिक आणि महिला भगिनींच्या उपस्थितीने कार्यक्रमालाउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags