
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर (पुणे शहर) –प्रतिनीधी
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पथकाने तब्बल १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा वाहतूक करणारी रिक्षा पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत रिक्षासह मिळून सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईची माहिती
दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या एका रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची गोपनीय माहिती पोलिस शिपाई राहुल कर्डीले यांना मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्वतंत्र पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने थेऊर रेल्वे पुलाजवळ संशयित रिक्षा अडवून तपासणी केली असता, चालक लक्ष्मण राजू पवार (३०, रा. निगडी) व त्याचा साथीदार रवि आण्णा कु-हाडे (रा. निगडी) हे दोघे मिळून विक्रीसाठी अवैधरित्या गांजा वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले.
जप्त मुद्देमाल
गांजा – १२ किलो ३४५ ग्रॅम (किंमत अंदाजे २.४० लाख रुपये)
रिक्षा (MH14 LS 3146) – अंदाजे किंमत धरून एकूण मुद्देमाल जवळपास ५ लाख रुपये
गुन्हा नोंद
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२४/२०२५ नुसार
NDPS Act 8(क), 20(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यशस्वी कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पो.नि. कृष्णा बाबर तसेच पोलीस कर्मचारी माने, सातपुते, वणवे, देविकर, कर्डीले, सोनवणे, दडस, कुमार, पाटील, कुदळे, विर, गाडे, शिरगीरे यांनी केली.
पोलिसांची प्रतिक्रिया
“अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाणे सतत प्रभावी कारवाया करत आहे. भविष्यात अशाच धडाकेबाज मोहिमेद्वारे अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न सुरू राहील,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले.









