
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर, ता. हवेली :
लोणी काळभोर परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोडी केली असून तब्बल ₹१.६४ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
फिर्यादी मंगेश तुकाराम मोहिते (वय २९, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता ते २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६.५० वा. दरम्यान घडला. प्रथमेश अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२ मधील दरवाज्याचे व कपाटाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, नथी, कानातले, चांदीचे दागिने तसेच ₹३०,००० रोख रक्कम असा एकूण अंदाजे ₹१,६४,०००/- किंमतीचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. कृष्णा बाबर, पो.नि. सोमनाथ नळे, पो.उप.नि. योगेश पैठणे आदी अधिकारी करीत आहेत.









