पावसाळ्यातील चिखल त्रासाला अखेर दिलासा; भाविक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मोठा लाभ

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर (ता. हवेली) —
मौजे थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा वावर असतो. परंतु प्रत्येक पावसाळ्यात शाळेच्या परिसरात चिखल व पाण्याचे साम्राज्य निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शाळेच्या आवारातील काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
या कामामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह, चिंतामणी सहा आसनी रिक्षा संघटनेची वाहने येथे थांबवणाऱ्या चालकांना आणि आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सांस्कृतिक सभागृहात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

आज या कामाच्या शुभारंभानिमित्त भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, नाना शेडगे, दिनेश कुंजीर, तानाजी गायकवाड, शिवाजी वायकर, रमेश गोरसे, आप्पासाहेब मगर, अजित बोडके, राहुल कांबळे, महादेव कांबळे, बाळासाहेब कोल्हे, उद्धव हजारे, सलीम शेख, अमोल मोहोळकर, महेश चव्हाण, राजेंद्र हजारे, मारुती गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे केवळ शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित होणार नाही तर भाविक, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीही एक आदर्श पाऊल उचलले गेले असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.









