पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांना स्वागताची गौरवशाली संधी

Facebook
Twitter
WhatsApp

 

 

देशाच्या नेतृत्वाचा सन्मान करण्याचा अभिमानाचा क्षण — “पंतप्रधान मोदी साहेबांचे स्वागत करणे हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण” — आमदार माऊली आबा कटके

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुंबई दौऱ्यावेळी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची गौरवशाली संधी लाभली.

ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. सुनिल तटकरे साहेब आणि ज्येष्ठ नेते मा. प्रफुल्लभाई पटेल यांच्या माध्यमातून आमदार माऊली आबा कटके यांना प्राप्त झाली.

पंतप्रधान मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक उपक्रमांचा आढावा घेतला. त्यामुळे राज्यातील जनतेचे आणि माध्यमांचे लक्ष या दौऱ्याकडे केंद्रित झाले होते.

विमानतळावर सुरक्षा यंत्रणांकडून अभेद्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच पोलीस, विशेष संरक्षण पथक (SPG) आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सक्रिय होते. स्वागतासाठी निवडक मान्यवरांना परवानगी देण्यात आली होती.

पंतप्रधानांच्या विमानाचे आगमन होताच वातावरणात उत्साह आणि अभिमानाचे तरंग पसरले. विमानातून उतरल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे आमदार माऊली आबा कटके यांनी पारंपरिक ‘नमस्कार’ करून स्वागत केले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हा क्षण उपस्थित सर्वांसाठी स्मरणीय ठरला.

यावेळी आमदार मा. श्री. हिरामण खोसकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव श्री. राजेश कुमार साहेब, तसेच पोलीस महासंचालक सौ. रश्मी शुक्ला मॅडम उपस्थित होत्या. स्वागतानंतर पंतप्रधानांनी मान्यवरांशी संवाद साधत महाराष्ट्रातील विकासकामांविषयी माहिती घेतली.

आमदार माऊली आबा कटके म्हणाले, 

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भारताचा जागतिक सन्मान वाढवणारे नेतृत्व आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या प्रेरणेने शिरूर-हवेली मतदारसंघात विकासाचा वेग अधिक वाढविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”
त्यांनी पुढे सांगितले की
“पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात शेती, उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत क्रांतिकारी बदल होत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे.”

या प्रसंगानंतर आमदार कटके यांनी सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानत म्हटले कीअशा प्रसंगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे जनतेच्या विश्वासाचा सन्मान आहे. हा क्षण माझ्या राजकीय आयुष्यातील अविस्मरणीय ठरेल.”

विमानतळावर पंतप्रधानांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला. महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचा आत्मविश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags