

थेऊर | प्रतिनिधी
श्रीक्षेत्र थेऊर गावामध्ये पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार सुषमाताई संतोष मुरकुटे तसेच जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार कोमलताई संदेश शेठ आव्हाळे यांचे थेऊरकर नागरिकांच्या वतीने भव्य मिरवणुकीद्वारे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
थेऊर गावातील मुख्य रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या उत्साहात फुलांचा वर्षाव करत कोमलताई संदेश आव्हाळे व सुषमाताई मुरकुटे यांचे स्वागत केले. ढोल–ताशांच्या गजरात निघालेली ही भव्य मिरवणूक श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात पोहोचली. मंदिरात श्रींची विधीवत आरती करून सर्वांच्या वतीने आशीर्वाद घेण्यात आले.
यानंतर थेऊर गावातील प्रत्येक प्रभाग व वार्डामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या प्रचारामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी कोमलताई संदेश आव्हाळे यांनी काशी–अयोध्या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना काशी व अयोध्येचे दर्शन घडवून आणले असून, समाजोपयोगी उपक्रमांसाठी त्यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत थेऊरकर नागरिकांनी त्यांचे जाहीर स्वागत करत विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या स्वागत व प्रचार कार्यक्रमामुळे थेऊर परिसरात निवडणूक वातावरण अधिकच तापले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.










