
राष्ट्रहित टाईम्स
📍 थेऊर | हवेली तालुका प्रतिनिधी
१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या भिम अनुयायांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र थेऊर येथे पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच श्री चिंतामणी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून कोणताही पार्किंग कर आकारण्यात येणार नाही, अशी माहिती थेऊर ग्रामविकास अधिकारी श्री. तुकाराम पाटील यांनी दिली.
दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे अभिवादनासाठी जाणाऱ्या लाखो अनुयायांचा प्रवास श्रीक्षेत्र थेऊर मार्गे होत असतो. या पार्श्वभूमीवर थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने हा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
या निर्णयामुळे भिम अनुयायी तसेच श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, थेऊर गावच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे .










