थेऊर चिंतामणी मंदिर परिसरात हरवलेला कॅमेरा पोलिसांनी शोधून भाविकांना केला सुपूर्द

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स

थेऊर (प्रतिनिधी) :

श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा मौल्यवान कॅमेरा हरवल्याची घटना आज घडली.

भाविक संध्या खोडदे व अमित ऐतावडे यांचा सुमारे १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा मंदिराच्या आवारात हरवला होता. या घटनेनंतर भाविकांनी तात्काळ थेऊर पोलीस चौकीकडे माहिती दिली.

घटनेची दखल घेत PSI सोनटक्के सर, HC 7001 जगताप, PC 2746 शिंदे, थेऊर चौकी मार्शल तसेच PC ताम्हाणे व PC शिंगाडे यांनी तत्काळ मंदिर परिसरात शोधमोहीम राबवली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही वेळातच सदर कॅमेरा मंदिर परिसरात शोधून काढण्यात आला व तो सुरक्षितपणे संबंधित भाविकांना सुपूर्द करण्यात आला.

कॅमेरा परत मिळाल्यानंतर भाविक संध्या खोडदे व अमित ऐतावडे यांनी थेऊर पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

ही घटना थेऊर पोलीस चौकीच्या तत्परतेचे व जनसेवेच्या भूमिकेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags