
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
हिंगणगाव (प्रतिनिधी) :
कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मनोजतात्या चौधरी यांना गावागावातून प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः हिंगणगावमध्ये तरुणाईने मनोज तात्यांच्या विजयासाठी ठाम निर्धार केला असून युवक वर्ग भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.
मनोज चौधरी यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात राबवलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याच विश्वासातून त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे.
कोरेगाव मूळ गणासाठी मनोजतात्या चौधरी यांच्या रूपाने एक नवीन, सक्षम आणि युवा नेतृत्व उभे राहत आहे, अशी भावना तरुण वर्गात आहे. या नेतृत्वामुळे परिसराचा विकास वेगाने होईल, असा आशावाद युवकांमध्ये निर्माण झाला आहे.
याच कारणामुळे परिसरातील तरुणाई विशेषतः मनोज तात्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत असून, “युवा शक्तीच विजय घडवणार” अशी चर्चा सध्या संपूर्ण भागात रंगली आहे.
मनोज तात्यांना मिळणारा हा तरुणांचा विश्वासच आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.










