Raashtrahittimes संवाददाता: मुंबईच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. सायन रुग्णालयातील प्रथम वर्षाचा एक निवासी डॉक्टर (रेसिडेंट डॉक्टर) मृत अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या तरुण डॉक्टराने आपल्याच वसतिगृहातील (हॉस्टेल) बाथरुममध्ये टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा ताण, प्रचंड वर्कलोड आणि निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










