बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला हवालदार लाच घेताना रंगेहात अटक

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
बारामती (जि. पुणे) | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे घटकाने बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार अंजना विभीषण नागरगोजे (वय 38 वर्षे, ब.नं. 2309, पुणे ग्रामीण पोलीस) यांना ₹20,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
📌 घटना कशी घडली?
दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू-सासरे आणि मेहुण्याविरोधात बारामती पोलीस ठाण्यात 498A, 504, 506 भा.दं.वि. कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास महिला हवालदार अंजना नागरगोजे यांच्याकडे होता.
तक्रारदारास व त्यांच्या नातेवाईकांना अटक न करता गेट जामीन मिळवून देण्यासाठी नागरगोजे यांनी सुरुवातीला ₹1 लाख लाच मागितली होती. नंतर तडजोडीअंती प्रत्येकी ₹5,000 प्रमाणे एकूण ₹20,000 लाच मागणीवर सौदा ठरला.
📌 सापळा कारवाई
तक्रारदाराने 9 सप्टेंबर रोजी ACB पुणे कार्यालयात तक्रार केली. पडताळणीत नागरगोजे यांनी प्रत्यक्ष लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज 10 सप्टेंबर 2025 रोजी बारामती पोलीस ठाण्यातच ₹20,000 स्वीकारताना त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
📌 गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी महिला हवालदाराविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
📌 कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्रीमती सर्वदा सावळे आणि ACB पुणे पथकाने केली.
📌 जनतेस आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एजंट लाचेची मागणी करत असल्यास त्वरित ACB कार्यालया
शी संपर्क साधावा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags