छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कोरटकरलाअखेर अटक.

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देणार प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांना सापडला आहे.

तेलंगणामधून कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गेल्या ३० दिवसांपासून फरार असलेला कोरटकर हा त्याच्या चुकीने पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

 

कोल्हापूर कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकरचे धाबे दणादणले होते. त्याने हायकोर्टातही धाव घेतली पण कोर्टाने निर्णय कायम ठेवला. त्यामुळे कोरटकरला अटक होणार हे अटळ होतं. पण कोरटकर पोलिसांना सापडणार कधी हा मोठा प्रश्न होता. आज ३० दिवसांनी दुपारी कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरटकरच्या अटकेची माहिती दिली.

 

असा सापडला कोरटकर!

 

मागील ३० दिवसांपासून कोरटकर हा महाराष्ट्र आणि शेजारी राज्यामध्ये फिरत होता. आज तो आपला विश्वासू सहकारी परीक्षितसह तेलंगणामध्ये होता. तेलंगणात परीक्षित दिसल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर लगेच पोलिसांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवत कोरटकर आणि परीक्षित याला ताब्यात घेतलं. दोघांनाही रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर कोरटकर आणि परीक्षितला कोल्हापूर पोलिसांकडे सोपवण्यात आलं.

कोल्हापूर पोलिसांनी घेतलं ताब्यात

 

कोल्हापूर पोलीस कोरटकरला घेऊन कोल्हापूरला रवाना झाले आहे. तेलंगणा पोलिसांतील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पोलिसांनी कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरला अटकेची पोलिसांनी दिली. आता कोरटकरला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केले जाणारआहे.

 

कोरटकरच्या वकिलांकडून अटकपूर्व जामीन मागे

 

दरम्यान, कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर लगेच त्याच्या वकिलांना हालचाल सुरू केली.

प्रशांत कोरटकरला अटक झाल्याने त्याच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. आता कोर्टात काय सुनावणी होणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags