राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे, २ मे २०२५ – पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संभाव्य धोके लक्षात घेता, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वतीने आज दुपारी १२.३० ते १.१५ या वेळेत लॉज व हॉटेल मालक-चालक यांची महत्वाची सुरक्षा बैठक घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत परिसरातील सर्व लॉज व हॉटेल चालकांना सुरक्षा विषयक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत पुढील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या:
1. लॉजमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची ओळख निश्चित करून रजिस्टरमध्ये नोंद करावी.
2. परदेशी नागरिकांसाठी ‘सी-फॉर्म’ भरून, त्यांच्या पासपोर्ट व व्हिसाची झेरॉक्स घेऊन रजिस्टरमध्ये नोंद आवश्यक.
3. लॉजमधील सर्व कर्मचारी वर्गाची चारित्र्य पडताळणी करून ठेवावी.
4. बालकामगारांना कामावर ठेवण्यास बंदी.
5. लॉजच्या प्रवेशद्वारावर आणि सभोवताल सीसीटीव्ही (एचडी व नाईट व्हिजन) कॅमेरे बसवावेत.
6. आग लागल्यास तत्काळ उपाययोजना करता याव्यात म्हणून फायर फायटिंग साहित्य उपलब्ध ठेवावे.
7. दर्शनी भिंतीवर आपत्कालीन संपर्क क्रमांक लावावेत.
8. लॉजसमोर वाहने उभी राहून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
9. संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्ष 112 किंवा काळेपडळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
या बैठकीला काळेपडळ परिसरातील खालील लॉज व हॉटेल चालक उपस्थित होते: दौलत लॉज, श्री लॉज, न्यू रॉयल लॉज, हर्ष लॉज, गौतम लॉज, सुयोग लॉज, साई सिद्धी लॉज, ऋतुराज लॉज, शनया इन लॉज, तत्व लॉज, रॉयल रेस्ट रूम, पृथ्वी एक्झिक्युटिव्ह लॉज, माऊंटन हाय इन लॉज, रॉयल गार्डन रिसॉर्ट लॉज, आचल लॉज, आनंद लॉज व कोरंथीयन क्लब.
या बैठकीतून परिसराच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, नागरिकांनी देखील संशयित हालचाली आढळल्यास पोलिसांना त्वरित माहि
ती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.