
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर, ता. हवेली :
स्थानिक पोलिसांनी कारवाई करून रमी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी पोलीस शिपाई योगेश उदमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ५.५० वा. पांढरे मळा, लोणी काळभोर येथील कांबळे यांच्या शेतात संशयित इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धाड टाकून लक्ष्मण महादेव शिंदे, प्रविण यशवंत काळे, अजमुद्दीन शेख, सुनिल काळभोर व गणेश केसकर या पाच जणांना ताब्यात घेतले.
या वेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ₹१,३००/- रोख रक्कम व १०४ कागदी पत्ते असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.










