राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
शिरूर तालुक्यातील करडे येथील बांदल मळा शेतातील असणाऱ्या फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची चोरी केली आहे. याप्रकरणी राहुल गौतम कदम यांनी अज्ञात चोरट्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आला आहे.याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. ६) मार्च रोजी संध्याकाळी ५ ते (दि. ८) मार्च सकाळी ९ वा. च्या पुर्वी करडे (ता. शिरुर) गावच्या हद्दीत बांदलमळा शेतातील गट क्रं.५८३ मध्ये फिर्यादी यांची बहीण मोनिका अशोक पवार हिच्या फार्म हाउस मर्धील घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने कशाने तरी उघडुन घरातील टिव्ही, साउंड, गॅस सिलेडर टाकी, ड्रील मशिन, गोपी कंपनीचा मिक्सर, जेवनाची ३० स्टिलचे ताटे अशा एकुण अंदाजे २६,५०० रुपयांच्या वस्तु स्वताच्या फायद्या करीता अज्ञाताने चोरून नेल्या आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते हे करत आहे .