
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे (प्रतिनिधी) – विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या चमूने गुप्त माहितीच्या आधारे एक मोठी कारवाई करत एका तरुणाकडून दोन पिस्तुल आणि एक काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलिस स्टेशन हद्दीत तपास पथकातील पोलिस अंमलदार आशीष खरात आणि अमिन शेख यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, राजेंद्रनगर भागात एक इसम अवैध शस्त्रासह येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी धाड टाकली आणि संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव मयुर सचिन भोइरे (वय २०, रा. पाचव वस्ती, गणपत नगर, बिबवेवाडी, पुणे) असे समोर आले.
त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल व एक काडतूस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध गु.र.नं. २०५/२०२५, भा.पु.अ. कलम ३(२५) सह १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १९(१)(३) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कारवाईतील अधिकारी
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त प्रदीप बन्सोडे, पोलीस उपायुक्त कृष्णकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ घोरे, पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनंत घोडके, तसेच उपनिरीक्षक राजेश जगताप, आशीष खरात, अनिल घोरे, शैलेश सुर्वे, अमित आंबोरे, अमोल जगताप, जुनैद शेख, राहुल मोरे, अमिन शेख, नितीन बाबर, सागर मोरे, श्रीकांत गायकर व राहुल मारणे यांनी सहभाग नोंदवला.
मुद्देमाल
पोलिसांनी आरोपीकडून दोन पिस्तुल, एक काडतूस व ₹९,२००/- किंमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे.









