पुणे – १० एप्रिल २०२५:
वाघोली परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या रस्त्यावरच्या धोकादायक रेसिंगवर वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाघोली येथील सेंट्रल साखर कामगार सोसायटी भागात दोन महिंद्रा थार गाड्यांद्वारे जोरदार रेसिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गाड्यांचे क्रमांक एम.एच.१२-क्यू.व्ही.८२१८ आणि एम.एच.१२-एक्स.झेड.४९५१ असून त्या नियमबाह्य रेसिंग करत होत्या. या प्रकरणात संबंधित वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कलम ३/१९६, १४६, १८४(१)(सी), १३८/१९० अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त परिक्षेत्र ८ चे श्री. राकेश जायस्वाल, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती सोनवणे, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन हिंगणे तसेच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वाघोली परिसरात अशा प्रकारची ही गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती. मात्र, पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत कायदा आणि सुव्यवस्थेचा धडा घालून दिला आहे.