दि.१५ लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील आरोपी सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे वय 19 वर्षे रा.कवडी पाट टोलनाका, कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी साथीदारासह १०/०६/२०२४ रात्री ०८.४५ वा.चे सुमारास कवडीपाट टोल नाका परिसरात राहुलकुमार सैनी यांना साथीदार यांचेसह मारहाणं केल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर देखील त्याने गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून दिनांक 13/06/2024 रोजी फिर्यादी यांचे मालक आकाश काळभोर यांना फोन करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे सदर आरोपीस सीआरपीसी 151 (३) प्रमाणे स्थानबद्धतेचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला असता न्यायालयाने सदर आरोपीस 05 दिवस येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करणे कामी आदेश दिले. आरोपीस येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे जमा केलेले आहे.
यापुढे ही शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.
सदरची कारवाई मा. श्री. आर . राजा,पोलीस उपायुक्त परिमंडळ 05, मा.श्री. अश्विनी राख,सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलीस नाईक संदीप धनवटे, पोलीस अमलदार मंगेश नानापुरे, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे यांनी केली आहे.