नायगाव येथे अजितदादांच्या अस्थी कलशाचे पूजन; भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स

नायगाव (प्रतिनिधी):

महाराष्ट्राच्या राजकारणात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नायगाव येथे त्यांच्या अस्थी कलशाचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी परिसरात शोकाकुल वातावरण असून उपस्थितांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण अभिवादन केले.

या श्रद्धांजली कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जी.बी. चौधरी, राज्य सरचिटणीस आबासाहेब काळे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय चौधरी,अमोल चौधरी, कोरेगाव मूळ गणातील उमेदवार मनोजतात्या चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या रसिका चोंदे हे उपस्थित होते.

कार्यक्रमात अजितदादांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयक्षम नेतृत्वाचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक सक्षम, दूरदृष्टीचा नेता गमावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना सर्वांनी अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags