जाहीर खुलासा
राष्ट्रहित टाईम्स न्यूज पोर्टलच्या १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये येथील रहिवासी रवींद्र ज्ञानेश्वर लगड यांचेविषयी सराईत गुन्हेगार असा असा उल्लेख करण्यात आलेला होता.
रिपब्लिकन सेना पदाधिकारी यांनी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या उल्लेखाप्रमाणेच आहे.या बातमी मध्ये बातमीदार अथवा संपादक यांनी एक ही शब्द स्वतः चा टाकलेला नाही.
सराईत गुन्हेगार हा शब्दप्रयोग एका पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे केला गेला होता.वअसा शब्दप्रयोग निवेदनात सुध्दा होता.संपादक अथवा साप्ताहिक राष्ट्रहित टाईम्स यांचा उद्देश कोणाची बदनामी करण्याचा किंवा अपमान करण्याचा नव्हता अथवा नाही.
तरीसुद्धा कोणाची बदनामी अथवा अपमान झाला असेल तर त्याबाबत साप्ताहिक राष्ट्रहित टाईम्स संपादक यांचे वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.
व या बातमीमध्ये उल्लेख करण्यात आलेला सराईत गुन्हेगार हा शब्दप्रयोग या पुढे वाचनात येऊ नये.त्या ऐवजी संशयित आरोपी असा शब्द वाचनात यावा हि विनंती
यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या दहिटणे गावातील रवींद्र ज्ञानेश्वर लगड त्याच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे व अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत,
रवींद्र ज्ञानेश्वर लगड याची दहिटणे परिसरामध्ये प्रचंड
दहशत आहे. महिला, मुली यांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे. तो व त्याची पत्नी
गावातील व भावकीतील लोकांवर तो खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याचे
प्रयत्न करीत आहे. त्याच्या या वर्तनुकीमुळे दहिटणे परिसरात दहशतीचे वातावरण
आहे. नुकतीच दोन महिन्यापूर्वी दहिटणे गावातील उच्चशिक्षित तरुण व त्याच्या
कुटुंवियांवर त्याने पत्नीच्या नावाने खोटे गुन्हे दाखल केले. या दाखल गुन्हे मध्ये यवत
पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईस उच्चशिक्षित हा तरुण व त्याचे
कुटुंबीय सामोरे गेले. परंतु एवढे करून देखील रवींद्र लगड शांत बसला नाही, असे
त्याचे म्हणणे आहे की संबंधित गुन्ह्यामध्ये कारवाई केली नाही म्हणून यवत पोलीस स्टेशन चे अधिकारी, ठाणे अंमलदार, यांच्या विरोधात सामाजिक संघटनांना हाताशी धरून कारवाईची मागणी करत आहे.
रवींद्र ज्ञानेश्वर लगड याच्यापासुन दहिटणे व परिसरातील समाजा मधील भगिनींना धोका आहे, त्याच प्रमाणे निपक्षपणे काम करणारे पोलीस खाते सुद्धा याच्या खोट्या तक्रारी मुळे त्रस्थ आहे, त्या शिवाय पोलिसांन विरोधात सामाजिक संघटना हाताशी धरून आंदोलन केल्याने पोलीस खात्याचे मनोधैर्य खच्ची होत आहे, व भविष्यात काम करताना निपक्षपणे काम होईल का नाही याची शक्यता देता येणार नाही, त्यामुळे रवींद्र लगड याचेवर तडीपारीची कारवाई करून त्याला समाजामधून हद्दपार करावे हि विनंती. रवींद्र लगड याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा दहिटणे परिसरातील सर्वसामान्य नागरीक व रिपब्लिक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.