राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. २६ : छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्ताने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.