जागरण गोंधळ घालणार्‍याने घातला गोंधळ ! अरण्येश्वरचा भाई म्हणविणार्‍याने फोडल्या गाड्यांच्या काचा

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : जागरण गोंधळ घालण्याचा व्यवसाय करणारा स्वत:ला अरणेश्वरचा भाई म्हणवून घेतो, त्याने पहाटे गोंधळ घालत गाड्याच्या काचा फोडल्या. अक्षय राजेश बाबर (वय १८, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कोंढवा)असे आरोपीचे नाव आहे. याबाबत कांचन मयूर डहाळे (वय २९, रा. संतनगर, अरण्येश्वर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना अरण्येश्वर रोड वरील अरण्येश्वर दर्शन सोसायटी येथे गुरुवारी पहाटे अडीच वाजता घडली.

 

 

अक्षय बाबर याचा जागरण गोंधळचा व्यवसाय आहे. अरण्येश्वर दर्शन येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या फिर्यादी व करण किशोर खैरनार यांच्या गाडीची तोडफोड करुन ४५ हजार रुपयांचे नुकसान केले. याबाबत त्याला विचारल्यावर त्याने “मला ओळखत नाही का, माझे नाव अक्षय बाबर आहे. मी अरण्येश्वरचा भाई आहे. माझ्या नादाला लागला तर एकालाही सोडणार नाही, असे म्हणून लोकांच्या अंगावर धावून जाऊन दहशत करुन आरडाओरडा करत तेथून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे  पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस डी फकीर  तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags