राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन: अजित पवार यांच्या न्हावरे येथील झालेल्या सभेचा खरपूस समाचार घेत उरुळी कांचन येथील प्रचार सभेत खासदार डॉ.अमोल कोल्हे अजित पवारांना यांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या उरुळी कांचन प्रचार सभा खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी न्हावरे येथील सभेत अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर म्हणाले की, आमच्या मतदारसंघात येऊन टीका करणाऱ्यांना त्यांचे बारामतीत जाऊन उत्तर देणार , इलाका तुम्हारा धमाका हमारा अशा अजित पवार यांना टोला लगावला.
ते पुढे म्हणाले की, गद्दारांना त्यांच्या गावातून येऊन उत्तर देणार असून स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना घरी पाठविण्याचे काम केल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही.
शिरूर हवेली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अशोक पवार यांच्या प्रचार सभेसाठी उरुळी कांचन येथे बोलत होते. यावेळी उमेदवार अशोक पवार, देविदास भन्साळी ,के .डी. कांचन ,सोपान कांचन ,महादेव काळभोर ,संतोष कुंजीर , स्वप्निल कुंजीर, सागर कांचन, संदीप गोते ,जगदीश महाडिक, अनिल कांचन पोपट महाडिक, सचिन कांचन ,धनंजय चौधरी, विजय तुपे ,समीर कांचन, रामदास तुपे ,संतोष गायकवाड शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी खासदार अमोल कोल्हे पुढे म्हाणाले राज्यात सत्तेसाठी गेले असताना अर्थमंत्री असताना शेतकऱ्याच्या बाजूने, सर्वसामान्य बाजूने कधी आपण सरकारमध्ये आवाज उठवला का . विद्यार्थ्यांच्या पेन्सिल वह्यापासून ते शेतकऱ्याच्या औजारे बी , बियाणे पर्यंत जी .एस .टी जनतेचे कंमरडे मोडले .जी.एस .टी बंद करण्यासाठी कधी आपण मंत्रिमंडळात आवाज उठवला का. जनतेला खोटं बोलायचं हे काम तुम्ही केले आहे जनता आता तुमचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये गद्दारांना जागा नाही. महाराष्ट्रामध्ये दोन मराठी माणसाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना तसेच शरद पवार यांनी निर्माण केलेली राष्ट्रवादी पक्ष फोडले चिन्ह पळविले पक्षाचे नाव पळविले सतेसाठी गद्दारांच्या मांडी लावून बसल्याने जनता कधीही माफ करणार नाही .येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही दिवसेंदिवस महागाई गगनाला मिळत आहे डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव ,महागाई नी सर्वसामान्य माणसाला देश घडीला लावली आहे एका हाताने योजना द्यायची आणि दहा हाताने ओरडून घ्यायची हे महायुतीच्या सरकार कारभार आहे . महाराष्ट्रात रोज आठ शेतकरी आत्महत्या करतात . शेतकऱ्यांच्या कुटुंब अनाथ होत चालला आहे याचा कधीही सरकारने विचार केला नाही. स्वाभिमानी शेतकरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना घरी पाठवण्याची वेळ आता जनतेने करावी अशी आव्हान केले आहे .
यावेळी शिवसेनेचे हवेली चे नेते स्वप्निल कुंजीर म्हणले की, वाघोलीतील “मयुरी” चा छळ थांबवा. मयुरी या प्रकल्पातील कष्टकरी ग्राहकांना न्याय द्यावा लागेल.
उमेदवार अशोक पवार यांनी म्हणाले की ,मी अजित पवार यांच्यासोबत गेलो नाही म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडला .यशवंत सहकारी साखर सुरू करण्यासाठी अनेक वेळा मी अजित पवार प्रयत्न केला. कारखान्यात चालू करायचा नाही असंही भुमिका घेतली .मी जनतेच्या विश्वासावर आमदार झालो . मी जनतेला कधीही धोका देणार नाही तसेच स्वतःच्या फायद्यासाठी कारखान्याची सभासद व जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. मी जनतेचा कायम सेवक म्हणून शरद पवार यांचा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे .शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणार असून विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी के.डी. कांचन , देविदास भन्साळी स्वप्निल कुंजीर पाटील,संतोष चौधरी , सविता कांचन ,धनंजय चौधरी , दत्तात्रय कांचन , सौ.सविता कांचन यांनी मनोगत व्यक्त केले .