कुंजीरवाडीमध्ये राष्ट्रवादीचा रणशिंग फुंकला!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रचार नियोजन बैठकीला उस्फूर्त प्रतिसाद; बैठक नव्हे तर जणू भव्य विजयसभा!

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा

कुंजीरवाडी (प्रतिनिधी) :

थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट तसेच थेऊर–कुंजीरवाडी–म्हातोबाची आळंदी पंचायत समिती गण अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने थेऊर महत्वाची आळंदी जिल्हा परिषद गट सौ कोमल संदेश आव्हाळे व थेऊर कुंजीरवाडी मातोबाची आळंदी पंचायत समिती गण श्री युवराज हिरामण काकडे यांच्या प्रचार नियोजनासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक कुंजीरवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीसाठी गटातील महत्त्वाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिला भगिनी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने निमंत्रित करण्यात आले होते. मात्र ही बैठक केवळ नियोजनापुरती मर्यादित न राहता, उपस्थितांची प्रचंड गर्दी पाहता ही बैठक नव्हे तर जणू भव्य सभा असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.

बैठकीत निर्माण झालेला उत्साह आणि गर्दीचा ओघ पाहता, कुंजीरवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवत होता. उपस्थितांनी एकमुखी भूमिका घेत प्रचार यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

🌟 कोमलताई आव्हाळे यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक लाट

या बैठकीत विशेष चर्चा झाली ती सौ. कोमलताई संदेश आव्हाळे यांच्या कार्यशैलीबाबत.

संदेश शेठ आव्हाळे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून कोमलताईंनी काशी–अयोध्या यात्रेचे तीन टप्प्यांत यशस्वी आयोजन, सामुहिक गंगा पूजन,तसेच महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद गटात कोमलताईंविषयी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

💪 युवराज नाना काकडे : जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर तत्पर नेतृत्व

या बैठकीत आरोग्यदूत म्हणून परिचित असलेले युवराज नाना काकडे यांच्या कार्याचीही विशेष दखल घेण्यात आली.

रस्ते, पाणी, वीज, महसूल विभाग, एमएसईबी, पोलीस प्रशासन किंवा कोणताही मूलभूत प्रश्न असो — नागरिकांनी फोन केल्यानंतर तत्काळ उपलब्ध होणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून या भागात त्यांचा मोठा जनसमर्थनाचा पाया तयार झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

🔥 कुंजीरवाडीतील बैठक म्हणजे विजयाची नांदी!

या बैठकीने स्पष्ट संदेश दिला की, थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट आणि थेऊर–कुंजीरवाडी पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचाराची दिशा निश्चित केली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले असून कुंजीरवाडीतील ही बैठक म्हणजे विजयाची पहिली ठिणगी ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags