राष्ट्रगीत टाइम्स न्यूज नेटवर्क
दि.२५ अंगारकी संकष्टी चतुर्थीचा य़ोग आल्याने
श्रीक्षेत्र थेऊर येथील चिंतामणी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे.
अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधी व्रत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची व श्री गणरायाची कृपादृष्टी लाभते असे भाविकांची श्रद्धा आहे.संकष्टी चतुर्थीचे उपवास व्रत करावयाचे असल्यास सुरुवात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास व्रत सुरू करावे लागते.
श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.चिंचवड देवस्थान ट्रस्ट व मंदिराचे पुजारी आगलावे बंधू यांनी चोख व्यवस्था केली असल्याने भाविकांना दर्शन रांगेतुन दर्शन घेण्यासाठी अडचणी येत नव्हती.पावसाळा असल्याने दर्शन रांगेसाठी मंडप उभारण्यात आलेला आहे.