राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क
भारतीय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज दादा धिवार यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. भारतीय स्वयंसेवी संस्था विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या घटकांचा सन्मान करते. ही संस्था मागील दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विवीध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करून संबंधित व्यक्तीच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देत असते. या वर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज दादा धिवार यांना देण्यात आला. हा राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. एस.एन.पठाण हे होते . भारतीय स्वयंसेवा संस्था महासंघाचे अध्यक्ष गोरखजी साठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी देशातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 20 लोकांना राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात आले.