मुसळधार पावसातही प्रचाराचा धडाका; कुंजीरवाडी परिसरात सौ. कोमल संदेश आव्हाळे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स वृतत्तसेवा

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरात सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराला भर पावसानेही खीळ बसलेली दिसत नाही. मुसळधार पाऊस, चिखललेले रस्ते आणि प्रवासातील अडचणी असूनही उमेदवार सौ. कोमल संदेश आव्हाळे यांच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असून प्रचार यंत्रणा अधिक जोमाने काम करताना दिसत आहे.

या प्रचारात संदेश आव्हाळे स्वतः मतदारांच्या घरोघरी जाऊन थेट संपर्क साधत आहेत. पावसाची तमा न बाळगता नागरिकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. या संवादातून पाणीपुरवठ्याच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठ्यातील अडथळे, आरोग्य सेवा, शिक्षणाशी संबंधित प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी याबाबत मतदारांकडून थेट माहिती संकलित केली जात आहे.

“निवडणूक म्हणजे केवळ मते मागण्यापुरती मर्यादित नसून जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करणे हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा ठाम संकल्प आहे,” असे संदेश आव्हाळे यांनी यावेळी सांगितले.

पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते चिखलमय झाले असून वाहनांची ये-जा कठीण झाली आहे. तरीदेखील कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. छत्री, रेनकोट किंवा पावसात भिजतच कार्यकर्ते प्रचार फेऱ्या पूर्ण करत असल्याचे चित्र कुंजीरवाडी परिसरात पाहायला मिळत आहे.

या मेहनतीची दखल मतदारांकडूनही घेतली जात असून “अडचणीच्या परिस्थितीतही जनतेपर्यंत पोहोचण्याची उमेदवार व कार्यकर्त्यांची तयारी विश्वास वाढवणारी आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. परिणामी कुंजीरवाडी परिसरात सौ. कोमल संदेश आव्हाळे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags