रुपाली चाकणकरांच्या हकालपट्टीची मागणी.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

    मुख्यसचिव व महासंचालक महिला असताना महिलाअत्याचाराच्या घटनांकडे दुर्लक्ष धक्कादायक

पुणे : राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या व बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह व बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांची हकलपट्टी करावी अशी मागणी पुणे शहरातील कार्यरत असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.बदलापूर , लातूर , पुणे , संभाजीनगर इत्यादी शहरांमध्ये झालेल्या महिला व बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनुषंगाने अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे. अशा वेळी पीडित कुटुंबीयांना आधार देत त्यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याएैवजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी मात्र पिडीत कुटुंबियांनीच मुलींकडे लक्ष द्यावे या अनुषंगाने ची वक्तव्य केलेली आहेत. ही बाब अत्यंत धक्कादायक व निंदाव्य जनक असल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे.

राज्याच्या मुख्य सचिव पदी तसेच राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर महिला अधिकारी कार्यरत असताना या घटनांकडं प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहे हे अशोभनीय आहे. मुख्य सचिव व महासंचालक यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत , याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन व गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी व याबाबतची श्वेतपत्रिका तात्काळ जाहीर करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

अत्याचाराच्या घटनेतील आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ खटला चालून त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षक करण्यात यावी यासह अत्याचारग्रस्त पीडितांना मनोधैर्य व अन्य योजनेतून मिळणारी आर्थिक पुनर्वसन राशी तात्काळ अदा करण्यात यावी ही देखील मागणी करण्यात आलेली आहेअत्याचाराच्या घटनेतील आरोपींवर फास्टट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ खटला चालून त्यांच्यावर जास्तीत जास्त शिक्षक करण्यात यावी यासह अत्याचारग्रस्त पीडितांना मनोधैर्य व अन्य योजनेतून मिळणारी आर्थिक पुनर्वसन राशी तात्काळ अदा करण्यात यावी ही देखील मागणी करण्यात आलेली आहे. 

महिला अत्याचाराच्या प्रश्नावर जर सर्वच राजकीय पक्ष बोलत असतील तर ती स्वागतार्ह बाब असून त्याला कोणीही राजकारण समजू नये अशी विनंती देखील सत्ताधारी पक्षाला करण्यात येत आहे. 

*महाराष्ट्र बंद मध्ये देखील आम्ही सहभागी होऊ*विरोधी पक्षांकडून पुकारल्या गेलेल्या 24 ऑगस्ट च्या महाराष्ट्र बंद मध्ये देखील आम्ही सहभागी होऊ आणि हा बंद यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असा विश्वास या महिलांकडून व्यक्त करण्यात आला.

सदर शिष्टमंडळात रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे , ॲड. वैशाली चांदणे , शशिकला वाघमारे , स्नेहा माने , छाया कांबळे , रोहिणी शिंदे , राणी शिंदे , किरण कलावंत , परविन शेख , संजीवनी शिरतोडे , दिपाली चव्हाण , सीमा सुतार , लक्ष्मी कांबळे , रश्मी शिंदे , अफसाना पठाण , सरिता वाडेकर , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags