
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कुंजीरवाडी | प्रतिनिधी
कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच माननीय सचिन तात्या तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आणि घड्याळ चिन्हाला मतदान करणार अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटात सचिन तात्या तुपे हे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतील अशी चर्चा जोर धरत होती. कारण त्यांचे चिरंजीव सिद्धांत भैय्या तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती थेऊर गणासाठी इच्छुक उमेदवार होते. त्यांनी गणामध्ये गाठीभेटी घेऊन प्रचारही सुरू केला होता.
सिद्धांत तुपे प्रचार यंत्रणेत आघाडीवर असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन त्यांना उमेदवारी न मिळाल्याने सचिनतात्या तुपे व त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली होती.
यामुळे “सचिन तात्या तुपे राष्ट्रवादीच्या विरोधात काम करतील” अशा अफवा पसरल्या होत्या.
स्पष्ट भूमिकेमुळे चर्चांना छेद
परंतु आता सचिनतात्या तुपे यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची भूमिका घेतल्यामुळे या सर्व चर्चांना छेद बसला आहे. येणाऱ्या काळात सचिन तात्या तुपे आणि त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीसाठी जोमाने काम करणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्याचा विश्वास
थेऊर–आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटासह थेऊर–महत्त्वाची आळंदी गण आणि कोलवडी–आव्हाळवाडी गण या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा रोवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
राष्ट्रवादी उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळणार?
या गटात राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून
थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गट कोमलताई संदेश आव्हाळे, कोलवडी आव्हाळवाडी गण सुषमाताई संतोष मुरकुटे आणि थेऊर म्हातोबाची आळंदी गण युवराज हिरामण काकडे हे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी चर्चा जिल्हा परिषद गटातील नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
राजकीय समीकरणे बदलत असली तरी अंतिम निकाल काय लागेल हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ७ फेब्रुवारीलाच सर्व चित्र स्पष्ट होणार, हे मात्र निश्चित.










