ऊरळी कांचन दि.३१: पुणेरी आवाज रेडिओ यांचे ७. वे वर्धापन दिनानिमित्त उरुळी कांचन येथील साने संगीत कला मंच च्या बालचमू यांनी रेकॉर्डिंग कार्यक्रम सादर केला. रेकॉर्डिंग व प्रक्षेपण पुणेरी आवाज रेडिओ केंद्र रहाटणी पुणे येथे संपन्न झाला. साने संगीत कलामंचचे प्रमुख शिवराज साने यांना या कार्यक्रमासाठी पुणेरी आवाज रेडिओ केंद्र रहाटणी यांनी आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे विषय अभंग, गवळण ,लोकगीत भावगीत, हिंदी मराठी गीत ,भारुड, महापुरुष, स्वच्छता, पाणलोट ,अंधश्रद्धा ,व्यसनमुक्ती स्त्रीभ्रूण हत्या ,हुंडाबंदी ,राष्ट्रीय सण ,देशभक्ती पर्यावरण अशा अनेक विषयावर कार्यक्रम बालचमूनी सादर केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आर. जे. बंड्या , तेजस्विनीम , संगीतकार शिवराज साने. विशाल वाकडकर,अमोल. वाकडकर,श्रीकल्लूराम भोंडवे,इतर मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कलामंचच्या सोनाली सुकळे ,वेदांत गायकवाड, संकेत खंडागळे,रेखा साने, सुलतान तांबोळी, आनंदी वाघमारे , शिवराज साने, रिआन गाडीलकर, यांनी वादन, गायन , कला, सादरीकरण केले.
