राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
लोणी-काळभोर येथील दिगंबर जोगदंड यांची मातंग एकता अंदोलनच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना नियुक्तीचे पत्र माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते देण्यात आले.
दिगंबर जोगदंड हे लोणी-काळभोर येथील मातंग समाजाचे तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जाते.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा यासाठी पुणे ते मुंबई पायी पदयात्रा काढून पावसाळी अधिवेशनाचे लक्ष वेधणारा हा झुंजार कार्यकर्ता आहे तसेच समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे उपोषण सहा दिवसाचे आमरण उपोषण केले होते व अहोरात्र समाजासाठी न्यायनिवाडा करणारा हा कार्यकर्ता असून समाजामध्ये अतिशय मोलाचे योगदान दिगंबर जोगदंड यांचे आहे. तसेच दिगंबर जोगदंड निवडीनंतर म्हणाले की मातंग समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.