राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ लोणी काळभोर येथील खोकलाई चौकात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . यावेळी सकाळची वेळ असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही जेव्हा निधी मागतो तेव्हा आमच्यासमोर काट मारली जाते. आम्ही निष्ठावान आहोत, आम्ही खरं बोलतॊ. निष्ठावान असणं हा गुन्हा असेल तर तो मान्य आहे. बँक लुटणं त्याला मिडल आहे.
मी अशोक पवार व अमोल कोल्हे खासदार आमच्या तिघांची इमानदारी ही ताकद आहे. बारामती मध्ये अजित पवारांसमोर मंगलदास बांदल यांनी शरद पवारांना संपवण्याची भाषा केली. पण मी मात्र विरोधकांना संपवण्याची भाषा करणार नाही. मी अशोक पवार यांना विकासासाठी मत मागत आहे.
यावेळी बोलताना उमेदवार अशोक पवार म्हणाले, की हवेली तालुक्यातील परिसरात वाहतूक समस्या वाढत आहे. यासाठी आदरणीय गडकरी साहेबांच्याकडे भैरोबा नाला ते चौफुल्यापर्यंत पुलाची ची मागणी केली. ती मागणी मान्य केली. फ्लायओव्हरची तरतूद करून ती आपण मंजूर करून घेतोय. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल.
कारखान्याला कर्ज देऊ पण आमच्याकडे या अशी ऑफर दिली. ४२ आमदार फुटून ते गद्दारांकडे जाऊन गद्दार झाले. या ४२ आमदारांचे काय हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. दोन वर्षापूर्वी विधानसभा अधिवेशनाच्या वेळी विधान भावनांच्या पायरीवर आम्ही उभा होतो तेव्हा आम्ही आमदार घोषणा देत होतो. पन्नास खोके एकदम ओके’ तुम्ही क्लिप्स पाहू शकता.
प्रवक्ते विकास लवांडे बोलताना म्हणाले, जून २०१९ मध्ये शिवाजी बँकेत घोटाळा करून तो मयुरी प्रकल्प का उभा केला आहे. सगळी बँक खाल्ली आणि आता यांना पुढे आणले आहे. यांना मतदार माहीत नाहीत, गावे माहीत नाहीत. यशवंत कारखाना बंद का केला? २०१४ मध्ये आश्वासन दिलं होतं कारखाना सुरु करू. काय झालं त्याच? आपल्याला पवार साहेबांसोबत राहायचे आहे. अशोक पवार हे शुद्ध चारित्र्याचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
समोरचे लोकांचे मंगलदास बांदल यांच्या साक्षीने झालेले करार पत्र काय आहे ते माझ्याकडे आहे.मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचे नाही. त्यामुळे अशोक पवार यांना मत म्हणजे साहेबांना मत. कमीपणा येईल असं कृत्य त्यांनी कधी केलं नाही. लोकसभेला गद्दारी करणारं पार्सल आणलं. लोकसभेप्रमाणे समोर उभे असणाऱ्या उमेदवाराचा या निवडणुकीत आढळराव करायचा
उपसभापती युगंधर काळभोर, जगनाथ शेवाळे, आप्पासाहेब काळभोर, माधव काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, शरद काळभोर, माजी सरपंच चंदर शेलार, नागेश काळभोर, विकास लवांडे, संदीप गोते, संदीप पवार, सुभाष टिळेकर उपस्थित होते.