पुणे – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीसोबत घडलेल्या घटनेमुळे राज्यात निर्माण झालेला आक्रोश कायम असतानाच जिल्ह्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे.शिरूर तालुक्यातील कारेगाव इथं एका युवतीवर दोन नराधमांनी बलात्कार केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली.अमोल नारायण पोटे (वय २५ वर्षे रा. कारेगाव ता. शिरूर जि.पुणे. मूळ रा. ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर आणि किशोर रामभाऊ काळे (वय २९ वर्षे, रा. कारेगाव ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. किल्ले धारूर ता. धारूर जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कारेगाव इथं पीडित तरुणी व तिचा मामे भाऊ असे दोघे घरापासून काही अंतरावर गप्पा मारत असताना आरोपी अमोल पोटे आणि किशोर रामभाऊ काळे हे मोटार सायकलवरून आले आणि चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तरुणीच्या मामेभावाला तिच्यासोबत शरीरसंबध करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढले. तसंच नंतर पीडितेसह तिच्या मामेभावाला जीवे मारण्याची धमकी देऊन नराधमांनी आळीपाळीने जबरदस्तीने शरीरसंबंध केले. तसंच पीडित तरुणीच्या गळ्यातील सोन्याचा बदाम व नाकातील सोन्याची रिंग जबरदस्तीने काढून घेतले आहेत.घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या प्राथमिक तपास करत आहेत.