शिव-भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची नम्रता ताई कांबळे यांची मागणी; आमदार आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे/हवेली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवादरम्यान उत्साहाच्या ओघात व काही तांत्रिक कारणास्तव शिवसैनिक आणि भीम सैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांना ‘विशेष बाब’ म्हणून तत्काळ मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा नम्रता ताई प्रशांत कांबळे यांनी केली आहे. यासंदर्भात…