हवेलीतील ग्रामपंचायतींना निधीचा खोळंबा; विकासकामे ठप्प — मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ द्या : सभापती युवराज काकडे
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा पुणे, हवेली : हवेली पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना मिळणारे मुद्रांकशुल्क अनुदान अद्याप वर्ग न झाल्यामुळे तालुक्यातील गावपातळीवरील विकासकामांना मोठा फटका बसत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुषण जोशी यांच्याकडे निवेदन सादर करत तात्काळ निधी वितरणाची मागणी केली…