आयआयटी मुंबई विद्यार्थी आत्महत्या प्रकरण: साहिल वाकोडेंच्या पालकांचा क्राईम ब्रँचमध्ये आठ तास तळ
Raashtrahittimes ग्राउंड रिपोर्ट: आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये घडलेल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी आत्महत्येने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. १८ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. साहिलच्या पालकांनी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच कार्यालयात तब्बल आठ तास उपस्थित राहून आपल्या मुलाच्या मृत्यूबाबतच्या संशयास्पद बाबी आणि त्याला कॅम्पसमध्ये सहन करावा…