गणपती विसर्जन: मुंबईत डीजेचा वापर कमी होऊनही आवाजाची पातळी १०७.८ डेसिबलवर
Raashtrahittimes संवाददाता: मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात एका बाजूला डीजे आणि मोठ्या आवाजाच्या स्पीकर्सवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असले, तरी ध्वनी प्रदूषणाची समस्या अजूनही गंभीर असल्याचे समोर आले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी आवाजाची पातळी १०७.८ डेसिबलपर्यंत नोंदवण्यात आली, जी मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक मानली जाते. मुंबई उच्च न्यायालयाने…