विधानभवन पायऱ्यांवर महाविकास आघाडीतील आमदारांचे आंदोलन…पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्युज नेटवर्क

मुंबई  – महायुतीचे पळपुटे सरकार म्हणत आज महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ व्हावी या मागण्या करण्यात आल्या.राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी ही आमची मागणी असल्याचे महाविकास आघीडतर्पे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags