राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
परभणी येथे समाजकंटकाकडून संविधानाची विटंबना करण्यात आली त्याचा निषेध अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स संघटनेच्या वतीने पुणे येथे करण्यात आला.
पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात परभणीत संविधानाच्या बाबतीत जो अनुचित प्रकार झालाय त्याचा निषेध म्हणुन आण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन चा मूळ मुद्दा हा की ज्यांना
या देशातील संविधान मान्य नाही त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही.
सविंधानाच्या बाबतीत जर कुणी छेडछाड केली तर आण्णा भाऊ साठे क्रांती फोर्स गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, या गोष्टीची प्रशासनाने दखल घ्यावी…, असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.
निवेदन देण्यासाठी ABS क्रांती फोर्स च्या वतीने,
राजाभाऊ आडागळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
सचिन काका शेलार पुणे जिल्हा अध्यक्ष.
सागर भाऊ साठे
पुणे युवा जिल्हाध्यक्ष.
विजय भाऊ सकट
पुणे युवा उपाध्यक्ष
आर्यन मेडे
सामाजिक कार्यकर्ते.
त्याच बरोबर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.