पोलीस आयुक्तांनी आदेश देऊनही 26 पोलीस ठाण्यांनी स्थापन केला नाही तृतीयपंथी संरक्षण कक्ष.

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस गॅझेटद्वारे जे वेळोवेळी जे आदेश, सुचना अथवा माहिती दिली जाते. त्याचे पालन करण्यास सांगण्यात येते, ते सर्व पोलीस आयुक्तांच्या आदेशाने दिले जात असते. पोलीस नोटीसाद्वारे केलेल्या सूचना या पोलिसांसाठी आदेशच असतो. असे असताना पोलीस नोटीसद्वारे दिलेल्या सुचनेनंतरही महिनाभर कोणीही त्यावर कृती केली नाही. त्यानंतर २९ जानेवारी रोजी दुसर्‍यांना वायरलेस संदेश दिला. तरीही २६ पोलीस ठाण्यांनी या आदेशाला हरताळ फासत अद्यापपर्यंत तृतीयपंथी संरक्षण कक्ष स्थापन केला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

समर्थ, खडक, शिवाजीनगर,सहकारनगर, लष्कर, डेक्कन, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, खडकी,येरवडा, कोंढवा, मार्केटयार्ड, वाघोली,फुरसुंगी, कोथरुड, उत्तमनगर, पर्वती, अलंकार, चतु:श्रृंगी, नांदेड सिटी, काळेपडळ, मुंढवा, बिबवेवाडी, लोणी काळभोर या पोलीस ठाण्यांनी अद्याप तृतीयपंथी संरक्षण कक्ष स्थापन केलेला नाही. पोलीस आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या पोलीस ठाण्यांनी तात्काळ तृतीयपंथी संरक्षण कक्ष स्थापन करुन त्याचा अहवाल आजच सादर करावा,असे आदेशात म्हटले आहे

समाज कल्याण आयुक्तालयाने सर्व पोलीस ठाण्यात तृतीय पंथीय संरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत सर्व पोलीस आयुक्तालये, पोलीस अधीक्षक कार्यालयांना १८ डिसेबरच्या पत्राने कळविले आहे. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाने २८ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस नोटीसद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना याची माहिती दिली. त्याला कोणीच प्रतिसाद न दिल्याने २९ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना वायरलेस करुन तृतीयपंथी संरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags