
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
पुणे (प्रतिनिधी) –
उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत मिळालेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मृत तरुणीचे नाव पूनम विनोद ठाकूर (वय २० वर्षे, व्यवसाय – नोकरी, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश संजय पाटोळे (वय २६ वर्षे, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे.
🔹 घटनेचा तपशील
दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता, उरुळी कांचन ते नायगाव रस्त्यावर प्रयागधाम हॉस्पिटलजवळ रस्त्याच्या कडेला एका युवतीचा मृतदेह आढळला.
घटनास्थळी तिचा मोबाईल फोन, चप्पल व इतर साहित्य मिळाले. डोक्याला गंभीर जखम व रक्तस्राव झालेला होता.
या प्रकरणी मयत युवतीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (वय २३ वर्षे, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टर नंबर २८३/२०२५ भा.दं.सं. कलम १०३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
🔹 तपास आणि आरोपीचा शोध
घटनेची गंभीर दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल (सो. पुणे ग्रामीण) यांनी घटनास्थळी भेट दिली.
तसेच माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी (सो. कोल्हापूर परिक्षेत्र) यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा व उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सुमारे २०० ते २५० लोकांची चौकशी करण्यात आली.
तपासादरम्यान सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसला परंतु परतताना दिसला नाही.
ही माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाल्यानंतर संशयिताची ओळख दिनेश संजय पाटोळे, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन अशी पटली.
🔹 आरोपीची कबुली
आरोपी दिनेश पाटोळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पूनम ठाकूर ही पायी चालत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
तीने नकार दिल्यामुळे आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
आरडाओरडा केल्यामुळे आरोपीने रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड मारून खून केला.
घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले.
त्याच्याकडील स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच-१२ एसझेड-६९६५) जप्त करण्यात आली असून ती त्याच्याच नावावर आहे
🔹 पोलिसांची कामगिरी
ही कारवाई माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी (सो. कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली व
माननीय पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल्ल (सो. पुणे ग्रामीण),
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिराजदार (बारामती विभाग),
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बाबुराव दडस (दौंड विभाग) यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव बांगडे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, गुन्हे शाखेचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते,
पोसई.अमित सिद्धपाटील,पोसई ईश्वर जाधव,
तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार —
सचिन घाडगे, असिफ शेख, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे, धीरज जाधव, भारत मोहोळ, रमेश भोसले . सुनील सस्ते ,अजित काळे ,कमलेश होले, विशाल रासकर ,उद्धव गायकवाड ,प्रशांत पवार प्रवीण चौधरी निलेश जाधव, हरी शितोळे, सुजाता भुजबळ, सावित्रा सांगळे, सुमित वाघ, दीपक यादव, सोमनाथ सुपेकर, सुवर्णा गायकवाड, ऋषिकेश रासकर, अश्वजीत मोहोड, अमोल खांडेकर, अमोल राऊत, राजकुमार भिसे यांनी सहकार्य केले.
🔹 पुढील कारवाई
आरोपी दिनेश पाटोळेला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे.पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशन करत आहे.










