
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
नायगाव (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केसनंद–कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ. सुरेखाताई रमेश हरगुडे तसेच कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील उमेदवार मनोज तात्या चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याला नायगाव परिसरात प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गावात आयोजित प्रचार रॅलीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत “घड्याळ” चिन्हाला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवत उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले.
या दौऱ्यादरम्यान सुरेखाताई हरगुडे व मनोज तात्या चौधरी यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर विश्वास व्यक्त केला. “जनतेच्या विश्वासावर विकासाची घडी बसवणार,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
नायगावमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण गटात राष्ट्रवादीचे वातावरण अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.










