लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा बंदी फक्त कागदावरच? कारवाईनंतरही टपऱ्यांवर सर्रास विक्री; शाळांच्या लगत नियमांची पायमल्ली
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा लोणी काळभोर : लोणी काळभोर व परिसरात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत एका गुटखा कारखान्यावर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा व बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर परिसरातील गुटखा विक्री कायमस्वरूपी थांबेल,…